Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan yojana & loan system in budget news ] : किसान सन्मान निधी योजनाबाबत सध्या मिडीयांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे , अर्थसंकल्पांमध्ये शेतकऱ्यांची नाराजगी दुर करण्यासाठी नेमक्या कोण-कोणत्या बाबींवर विचार केला जाणार आहे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत .

शेतकरी कामगार संघटना तसेच तज्ञांकडून पीएम किसान संन्मान निधी योजना अंतर्गत वर्षाला 10,000/- रुपये करण्याची मागणी करण्यात आलेली आहे . केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सन 2024-25 साठी सादर करणार आहेत . याकरीता केंद्रीय वित्त विभागांकडून , शेतकरी , नागरिक , व्यापारी यांच्याकडून विविध सुझाव / सुचना मागविण्यात आलेल्या होत्या .

यांमध्ये शेतकऱ्यांच्या परीने पीएम किसान योजनांच्या निधी मध्ये वाढ करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सुझाव आले आहेत . यांमध्ये प्रामुख्याने पीएम किसान योजनेचा पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या वार्षिक हप्त्यांमध्ये 6,000/- वरुन 10,000/- रुपये वार्षिक हप्ता करण्याची मागणी करण्यात आलेली आहे . सदर योजना अंतर्गत वाढ केल्यास , शेतकऱ्यांची नाराजगी देखिल दुर होईल असे तज्ञांचे मत आहेत .

पीएम किसान योजनांचे हप्ते नियोजित असावेत : पीएम किसान योजनांचे हप्ते हे निधीच्या उपलब्धा नुसार अदा करण्यात येते , परंतु सदर हप्ते हे नियोजित कालावधीनूसार दिले जावेत , अशी तरतुद करण्यात आली आहे , जेणे करुन शेतकऱ्यांना फायदा हेाईल .

याशिवाय पात्र शेतकऱ्यांना शेती विषयक अवजारे  ट्रॅक्टर , खत , रसायने अशा शेती संबंधीच्या खरेदीवर सबसिडी ही शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आलेली आहे . जसे कि खत , रसायने , अवजारे खरेदी करण्यासाठी व्यापारी तत्वावर सबसिडी मंजूर करण्यात येवू नयेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .

स्वस्त दराने कर्ज योजना , सोप्या व साध्या पद्धतीने देण्याची मागणी :  शेतकऱ्यांना स्वस्त व सोप्या / जलद पद्धतीने उपलब्ध होईल , अशी यंत्रणा अस्थित्वात आणावी , व त्याकरीता डीबीटी माध्यमाचा वापर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे .  

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *