Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PM Kisan Yojana Good News ] : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनाचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी अपडेट समोर येत आहेत . सदर योजना अंतर्गत आता केंद्र सरकारने पुर्णपणे डिजिटल व आधार संलग्नित करण्यात आलेले आहेत . जेणेकरुन मधील कोणताही दुवा ठेवण्यात आलेला नसून , थेट लाभार्थ्यांपर्यंत लाभ देण्यात आलेला आहे .
या योजनांच्या माध्यमातुन आत्तापर्यंत 11 कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे . तर या योजनांतर्गत नुकतेच 16 वा हप्ता जारी करण्यात आलेला आहे , तर आता 17 व्या हप्त्याची प्रतिक्षा सदर लाभार्थी करत आहेत . परंतु आता 17 व्या हप्ता काही लाभार्थ्यांचा अडकू शकतो . कारण केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार 17 व्या हप्ता करीता ई-केवायसी पुर्ण पुर्ण करणे आवश्यक असणार आहे .
यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील माहिती चुकिची असल्यास तसेच अर्जात नाव , लिंग अथवा दिलेला आधर क्रमांक चुकीचा असल्यास अशा लाभार्थ्यांनी अपडेट करुन घेणे आवश्यक असणार आहेत . अन्यथा अशा लाभार्थ्यांना 17 वा हप्त्यापासुन वंचित रहावे लागणार आहेत .
ई – केवायसी कशी पुर्ण कराल ? : – ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी पुर्ण करण्यासाठी आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देवून नोंदणी करुन ई-केवायसी पुर्ण करुन शकता ..
17 वा हप्ता : ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी पुर्ण आहे , अशा लाभार्थी शेतकऱ्यांना आता 17 व्या हप्त्याचे 2000/- रुपये रक्कम लवकरच खात्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहेत .यामुळे शेतकऱ्यांना लोकसभा निवडणूकी दरम्यान मोठा फायदा होणार आहे . शिवाय या दरम्यान राज्य शासनांच्या नमो महासन्मान निधी योजनांचा पुढील हप्ता देखिल जारी करण्यात येणार असल्याने , राज्यातील शेतकऱ्यांना एकुण 4000/- रुपयांचा लाभ प्राप्त होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .