Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan yoajana 18th installment ] : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत , तर सदर योजना अंतर्गत आता 18 वा हप्ता जमा करण्यात येणार आहे . सदर 18 हप्ता जमा करण्याची तारीख केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आलेली आहे .
या दिवशी खात्यात येणार पैसे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000/-रुपयांचा हप्ता दिनांक 05 ऑक्टोंबर 2024 रोजी जमा करण्यात येणार आहे . याकरीता केंद्र सरकारकडून नव्याने लाभार्थी यादी देखिल अपडेट करण्यात आली आहे . सदर योजना अंतर्गत 17 वा हप्ता हा देशातील तब्बल 9.26 कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेला आहे .
तर सदर 18 वा हप्ता करीता शेतकऱ्यांनी ई-केवायसी पुर्ण केलेल्या शेतकऱ्यांचेच नाव सदर लाभार्थी यादीमध्ये नाव अपडेट करण्यात आले आहेत . तर अद्याप ज्या शेतकऱ्यांनी सदर योजना अंतर्गत ई-केवायसी पुर्ण केली नाही , अशांनी अपडेट करुन घेण्याचे सुचित करण्यात आले आहेत .
सदर योजना अंतर्गत लाभार्थी यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर Beneficiary List या ऑप्शनवर क्लिक करुन चेक करावी .
यामुळे आता बऱ्याच दिवसांपासुन 18 वा हप्त्याचे प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सदर योजना अंतर्गत 2000/- रुपयांची रक्कम दिनांक 05 ऑक्टोंबर 2024 रोजी जमा केली जाणार आहे .