Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan scheme amount increase update ] : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वर्षाला 6,000/- रुपये तीन हत्यांमध्ये देण्यात येते , तर आता महागाईचा विचार करता , वर्षाला 12,000/- रुपये देण्याची शिफारस एका समितीने केंद्र सरकारकडे केला आहे , या बाबतची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय समितीचे अध्यक्ष मा.चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षखालील स्थायी समितीने शिफारस केल्यानुसार , प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वर्षाला 12 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला आहे . तर सदरची रक्कम ही 4 टप्यात देता येईल , प्रत्येक हप्त्याला 3 हजार रुपये असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे .
दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी केंद्रीय कृषी मंत्रालय समितीचे अध्यक्ष मा.चरणजीत सिंह यांनी लोकसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करुन सदर पीएम किसान योजनेच्या सन्मान राशीत दुप्पट वाढ करण्याची शिफारस केली आहे . त्या बाबतचा अधिकृत अहवाल देखिल सादर करण्यात आला आहे .
या योजना अंतर्गत वार्षिक 6,000/- रुपयाची मर्यादा वाढवून 12,000/- रुपये करण्याची करण्यात आलेली आहे . ही मागणी मान्य झाल्यास केंद्राचे दिनांक 01 फेब्रुवारी 2025 रोजी मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत तरतुद केली जाईल .
सदर योजना अंतर्गत 18 वा हप्ता माहे ऑक्टोंबर महिन्यात अदा करण्यात आला होता , तर आता 19 वा हप्ता माहे फेब्रुवारी महिन्यात अदा केला जावू शकतो , अशी माहिती सुत्रानुसार प्राप्त झाली आहे .