Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan scheme 17 installment ] : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे . तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे येतील , याबाबत आपले यादींमध्ये नाव आहे कि नाही याकरीता यादी चेक करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे .
नेरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीएम किसान योजनाचा 17 वा हप्ता अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे . यावेळी ज्या शेतकऱ्यांच्या ई-केवायसी पुर्ण असेल अशाच शेतकऱ्यांना 17 वा हप्त्याची रक्कम मिळणार आहे . याकरीता ज्यांचे ई-केवायसी स्टेटस पुर्ण झालेले नाहीत , अशांना आपले ई-केवायसी पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तर ज्यांना पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता अदा केला जाईल , अशा शेतकऱ्यांची यादी पीएम किसान योजनांच्या पोर्टलवर यादी जाहीर करण्यात आलेली आहे . ज्यांमध्ये आपले नाव आहे कि नाही याची खात्री करता येईल . यादीमध्ये आपले नाव असेल तरच आपल्या खात्यावर सदर योजनेतुन 17 व्या हप्त्याचे 2,000/-रुपये प्राप्त होणार आहे .
अशी करता येईल यादी चेक : आपण https://pmkisan.gov.in/ या पोर्टवर जावून लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पाहता येईल .सध्य स्थितीमध्ये काही काळाकरीता सदरचे पार्टल हे maintenance मोड वर आहे , ॲक्टिव झाल्याच्या नंतर यादी चेक करता येईल .