Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PM Kisan Sanman Yojana ] : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत , तर लोकसभा निवडणुकांच्या आचार संहितामुळे शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता रेंगाळत आहे , या संदर्भातील आत्ताची मोठी अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

शेतकऱ्यांना शेवटचा हप्ता ( 16 वा हप्ता ) हा दिनांक 28 फेब्रुवारी 2024 ला खात्यांवर जमा करण्यात आलेले आहेत . तर आता शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पेरणी साठी आवश्यक बियाणे , खते याकरीता काहीसा खर्च भरुन काढण्यासाठी , 17 वा हप्त्याची मदत होणार आहे . देशांमध्ये आता 4 जुन रोजी निकाल जाहीर होणार आहे , यामुळे दिनांक 4 जुन पर्यंत देशात आचारसंहिता सुरु राहील .

17 वा हप्ता कधी मिळणार : मिडिया रिपोर्ट नुसार सदर योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 17 वा हप्ताची रक्कम जुन महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

17 वा हप्ताकरीता केवायसी ठरणार महत्वपुर्ण : ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखिल केवायसी प्रक्रिया पुर्ण केलेली नाही , अशा शेतकऱ्यांना सदर योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभांपासून वंचित रहावे लागणार आहेत . यामुळे ज्यांची केवायसी अद्याप पुर्ण झालेली नाही , त्यांनी लवकरात लवकर पुर्ण करुन घ्यावेत .

सदर योजना अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 6,000/- रुपये इतका वार्षिक लाभ मिळत असतो , या वर्षातील 2,000/- रुपयांचा 16 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे , तर आता या वर्षातील दुसरा व योजनेचा 17 वा हप्ता जुन महिन्यांच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत जारी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *