Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan sanman nidhi yojana & Namo shetkari mahasanman yojana ] : केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6,000/- रुपये मतद निधी देण्यात येते , त्याच धर्तीवर राज्य शासनांकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत प्रति वर्षी 6000/- रुपये इतका निधी असे एकुण 12,000/- रुपये शेतकऱ्यांस सहाय्य करण्या येते .

प्रति वर्षी वरील दोन्ही योजनांमध्ये 3 हप्यात प्रति हप्ता 2000/- रुपये या प्रमाणे , शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी वर्ग करण्यात येते . आतापर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत एकुण 16 हप्ते केंद्र सरकारकडून अदा करण्यात आलेले आहेत , तर नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत 3 हप्त्यासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत .

पीएम सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्यासाठी ई-केवायसी आवश्यक : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी , आता ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहेत . त्याशिवाय 17 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : राज्यात शिक्षण क्षेत्रात शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी महाभरती 2024 , लगेच करा आवेदन !

17 वा हप्ता कधी मिळणार : मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना नियोजित कालावधीनुसार , पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल .

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्याकरीता निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत , परंतु काही जिल्ह्यांमध्ये फक्त पहीलाच हप्ता अदा करण्यात आलेला आहे . तीन हप्ते अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आले असल्याने ज्या शेतकऱ्यांचे 2 व तिसरा हप्ता बाकी आहे , अशा शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये लवकरच पैसे जमा होणार आहे . तर जुन महिन्यात चौथा हप्ता अदा करण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *