PM किसान योजनेचा 17 वा हप्ता अद्याप जमा झाला नसेल तर , असा करा तक्रार ; जाणुन घ्या सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan sanman nidhi yojana 17 installment news ] : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता अद्याप पर्यंत मिळालेला नाही , तर कशा प्रकारे तक्रार करावी , कोणत्या प्रकारची त्रुटी आहे , याबाबतची सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत .

लाभार्थी यादीमध्ये नाव पहावेत : आपण जर ई -केवायसी पुर्ण करुन देखिल आपणांस पीएम किसान सन्मान योजनेचा 17 वा हप्ता प्राप्त झालेला नाही , तर आपण प्रथम https://pmkisan.gov.in/  या संकेतस्थळावर जावून Beneficiary List  ( लाभार्थी यादी ) चेक करावी . यांमध्ये आपले नाव नसेल तर त्याच संकेतस्थळावर हेल्पलाईनला संपर्क करावा .

नावांमध्ये बदल : जर आपल्या नावांमध्ये बदल असल्यास , आपणांस 17 वा हप्ता प्राप्त झालेला नसेल , आधार कार्डावरचे नाव , बँक पासबुक वरचे नाव तसेच 7/12 वरचे नाव हे सारखेच असले पाहीजेत , अथवा वरील नमुद संकेतस्थळावर Name correction as per adhar या ऑप्शनवर जावून दुरुस्ती करुन घ्यायचे आहेत . ज्यांचे नावांमध्ये बदल होते , अशांना 17 वा हप्ता दिला गेला नाही .

तक्रार कशी करावी : आपण जर ई-केवायसी , नावांमध्ये बदल असल्यास दुरुस्ती करुन देखिल तसेच लाभार्थी यादींमध्ये नाव असून देखिल आपणांस पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळालेला नसेल , तर आपण 0120-6025109 , 011-24300606 या नंबरवर अथवा 155261 या नंबरवर तक्रार करु शकता ..

संकेतस्थळावर देखिल करु शकता तक्रार : https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर Helpdesk-Query Form या ऑप्शनवर जावून आपले आवेदन क्रमांक / मोबाईल नंबर टाकुन तक्रार सादर करु शकता , शिवाय या ठिकाणी आपले आवेदन क्रमांक / मोबाईल क्रमांक नमुद केल्यास आपणांस आपल्या त्रुटी नमुद होतील .

Leave a Comment