Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ pm kisan & namo kisan yojana installment] : निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे , तो म्हणजे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनांच्या हप्त्यांचे वितरण दिनांक 05 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे .
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 18 वा हप्ता 05 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल , त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करण्याकरिता , राज्य सरकारने 2,254/- कोटी रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे .
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत 05 ऑक्टोबरला एकूण 4,000/- रुपये खात्यामध्ये प्राप्त होणार आहेत . राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केव्हाही आचारसंहिता लागेल , यामुळे सरकारकडून विविध योजना अंतर्गत नागरिकांना लाभ अदा केला जात आहे . राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत चौथ्या हप्त्याचे वितरण नुकतेच परळी येथे झालेल्या कृषी प्रदर्शन दरम्यान करण्यात आले होते .
तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी घाई गडबडीत राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत पाचवा हप्ता अदा करण्याकरिता , निधी वितरणास मंजुरी दिली असून 05 ऑक्टोबरला सदर हप्त्याचे वितरण केले जाणार आहेत . त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत चौथा हप्ता प्रलंबित आहेत . अशा शेतकऱ्यांना देखील 05 ऑक्टोबरला सदर हप्ता अदा केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे .
त्याचबरोबर राज्यातील सोयाबीन , कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत निधी म्हणून , दहा हजार रुपये मर्यादित मदत निधी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे . तर ज्यांची ई – केवायसी पूर्ण आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कालपासून पैसे वर्ग केले जात आहेत . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना निवडणुकीच्या पूर्वीच मोठे आर्थिक लाभ मिळत आहेत .