Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PM Fish Farming Scheme ] : केंद्र सरकारने मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सुक्ष्म तसेच लघु उद्योग करीता पीएम मत्स्य संपदा अंतर्गत केंद्रीय क्षेत्रातील उप – योजना पंतप्रधान मत्स्य शेतकरी समृद्धी योजनास मंजूर देण्यात आलेली आहे .
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले कि , सदर योजना अंतर्गत आर्थिक वर्ष 2023-24 ते सन 2026-27 या पुढील चार वर्षांच्या काळांमध्ये देशातील सर्व राज्ये तसेच केंद्र शासित प्रदेश यांमध्ये 6 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुक करण्यात येईल . ज्यामुळे मासे आणि मत्स्य उत्पादनांची देशांतर्गत बाजारपेठेतील गुणवत्ता अधिक सुधारेल .
सदर पीएम मत्स्य शेतकरी समृद्धी येाजना अंतर्गत तब्बल 40 लाख आणि सुक्ष्म उद्योग यांना ओळख मिळवून देण्याकरीता राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय डिजिटल प्लॅट फॉर्म तयार केला जाणार आहे . त्याचबरोबर 6.4 लाख सूक्ष्म उपक्रम व 5,500 मत्स्यपालन सहकारी संस्थांना संस्थात्मक कर्ज ( Loan ) उपलब्ध करुन दिले जाणार आहेत . या योजना तुन मत्स्य व्यवसाय पारंपारिक अनुदानाची पद्धत कामगिरीच्या आधारवर प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे .
मत्स्य उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्तेपासून ते तंत्रज्ञान, काढणीनंतरच्या पायाभूत सुविधा आणि विपणनापर्यंतच्या मत्स्यव्यवसाय मूल्य शृंखलेतील गंभीर अंतर दूर करण्यासाठी PMMSY डिझाइन केले आहे. मूल्य साखळीचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करणे, शोधक्षमता वाढवणे आणि मच्छिमार आणि मत्स्यशेतकांचे सामाजिक-आर्थिक कल्याण सुनिश्चित करताना एक मजबूत मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन फ्रेमवर्क स्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
या योजनेतुन लाभ घेण्यासाठी पात्रता : या योजनेतुन कोळी , मत्स्य शेतकरी , मत्स्य काम करणारे कामगार , मत्स्य विकास संस्था / मंडळ , मत्स्य सहकारी संस्था , खाजगी फर्म , यापैकी कोणासही तसेच अनुसुचित जाती / जमाती /महीला अपंग उमेदवारांना प्रथम स्थान देण्यात येतील . तसेच लाभार्थ्याचे वय हे 18 -60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
कोणते लाभ मिळते : सदर योजनेतुन आपणांस मासे मारीचे जाळे , मत्स्यबीज , विविध प्रकारचे मासेनुसार जाळीचे विविध प्रकार खरेदी करण्यासाठी अनुदान , तसेच माशांच्या विकासासाठी अत्यावश्यक खाद्य , इतर साधने खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते .
अधिक माहितीसाठी https://pmmsy.dof.gov.in/farmers-corner या केंद्र सरकारच्या अधिकृत्त संकेतस्थळाला भेट द्या .