Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Postal Life Insurance ] : सरकारी – निमसरकारी व इतर नोकरदार वर्गांसाठी पोस्ट ऑफीसची सर्वाधिक लाभदायक गुंतवणूक योजना बाबत या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत . भारतीय डाक विमा ( PLI ) ही विमा पॉलिसी खास नोकरदार वर्गांसाठी सुरु करण्यात आलेली आहे . या योजनेचे खास वैशिष्ट्ये , आर्थिक लाभ व विमा हप्ता या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूयात ..

या योजनेचा लाभ कोण घेवू शकतो : भारतीय डाक विमा ( PLI ) या योजनेचा लाभ केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रामधील कर्मचारी त्याचबरोबर डॉक्टर , इंजिनिअर , वकिल , बॅंक कर्मचारी , आर्किटेक्चर , शैक्षणिक संस्था मधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी या योजनेचा लाभ घेवू शकता .

इतर पात्रता : लाभार्थीचे किमान वय हे 19 वर्षे तर कमाल वय हे 55 वर्षे असणे आवश्यक असणार आहेत . तर वयांनुसार पॉलिसी रक्कम नुसार विमा हप्ता भरावा लागतो . यांमध्ये आपण 15 वा वर्षाच्या किमान मुदतीकरीता देखिल विमा घेवू शकतो . या विम्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे इतर विमा कंपनी पेक्षा सर्वात जास्त बोनस रेट 48 टक्के  हे भारतीय डाक विम्याचे आहेत . जे कि , इतर विमा कंपनीपेक्षा आपल्याला अधिक लाभ प्राप्त होतो .

आपण जर 10 लाख रुपये रक्कमेची वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत भारतीय डाक विमा ( PLI ) घेतल्यास , आपणांस पॉलिसी हप्ता किती लागेच व मुदत अंती आपणास किती रक्कम प्राप्त होईल . याबाबत सविस्तर माहिती दर्शविणारा चार्ट पुढीलप्रमाणे पाहू शकता ..

भारतीय डाक विम्याचे खास वैशिष्ट्ये : भारतीय डाक विम्याचे खास वैशिष्ट्ये म्हणेज एक वर्षाचे हपते आगाऊ भरल्यानंतर 2 टक्के ऐवढे सूट ,तर सहा महिन्यांचे आगाऊ भरल्यास 1 टक्के पर्यंत सुट प्राप्त होईल . विम्याचा हप्ता ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने भरता येईल . या विम्याचा लाभ घेण्याकरीता आपल्या जवळच्या डाक कार्यालयांशी अथवा india post च्या अधिकृत्त संकेतस्थळाशी भेट द्या .

आवश्यक कागतपत्रे : या विमा योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला आधारकार्ड , पॅनकार्ड , पासपोर्ट साईज फोटो , नोकरीचे नियुक्तीपत्र / आयकार्ड किंवा व्यावसायिक धारकांसाठी  ( डॉक्टर , वकिल , इंजिनिअर इ.साठी ) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र  असणे आवश्यक असणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *