Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार , कृषी वार्ता : राज्यांमधे सध्या पाऊसाचा दुष्कानिवारणासाठी राज्य सरकार सतत प्रयत्न करत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या पाऊसाचा 21 दिवसापेक्षा ही जास्त खंड पडलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या परेशान आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया मध्ये पिक विमा भरलेला आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना लवकर पिक विमा मिळणार आहे.

ज्या क्षेत्रामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पाऊसाचा खंड पडलेला आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून मंजूर केला जाणार आहे. आपल्या राज्यांमध्ये 575 कोटी पिक विम्याचे वितरीत करण्यात यावे अशी मागणी केली आहे. महारष्ट्र राज्यामध्ये सध्या काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता परेशान आहे.

ज्या शेतकऱ्यांचे शेतातील खरिप पिके हातातून निसटून गेली आहे आशा शेतकऱ्यांचा खात्यांमध्ये लवकरात लवकर पिक विमा जमा केला जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना वाढीव पिक विमा मिळणार असल्याचे कृषी आयुक्तालय त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

राज्यांमधे काही ठिकाणी जनावराचा चाऱ्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याठिकाणी राज्य सरकार कडून चाऱ्यासाठी अनुदान निर्माण करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकतेच घेतला आहे. संपुर्ण महिती करिता खालिल आर्टिकल संपुर्ण वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *