Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : राज्यातील शेतकऱ्यांना सन 2023 मधील खरीप हंगामातील पिकांचे ओला व कोरडा दुष्काळामुळे झालेले नुकसान भरपाई करिता शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी ॲप्स वर नोंदणी करावी लागणार आहे . त्यानंतरच शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई वर दावा करता येणार आहे .

सध्या कोकण , पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे . यामुळे पिकांची अति पावसामुळे नुकसान झाले आहे . तर विदर्भ , मराठवाडा महसूल विभागामध्ये ऐन पीक फळामध्ये असताना , पावसाने धोका दिला आहे . यामुळे मराठवाडा विदर्भ मधील पिकांची कोरडा दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .

पिकांची नुकसान भरपाई करिता राज्य शासन त्याचबरोबर विमा कंपनीकडून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे . सध्या विदर्भ , मराठवाडा विभागांमध्ये कोरड्या दुष्काळाची राज्य शासनाकडून घोषणा करण्यात येणार आहे , याकरिता शेतकऱ्यांनी पिक पाहणी या ॲप्सवर पिकांची नोंदणी करणे आवश्यक असणार आहे . जेणेकरून पिकांच्या नुकसानीनुसार , राज्य शासन तसेच विमा कंपनीकडून अनुदान दिले जाणार आहे .

ई पीक पाहणी ॲप्स वर नोंदणी कशी कराल ? – आपल्या मोबाईल मध्ये ई – पीक पाहणी हे ॲप्स डाऊनलोड करून त्यावर आपले मोबाईल नंबर , गट नंबर , सर्वे नंबर इत्यादी माहिती नोंदवून लॉगिन करावे . त्यानंतर पीक माहिती या ऑप्शनवर सिलेक्ट करून पीक व पिकाचे क्षेत्र नोंद करावी नंतर अक्षांश – रेखांश असणारे जिओ टॅग फोटो काढून सबमिट करण्यात यावे , त्यानंतर आपली पिकाची माहिती नोंदणी केली जाईल .

ई पिक पाहणी ॲपवर अनेक माहिती आपल्याला नोंदवता येते , जसे की बांधावरची झाडे सिंचनाचे प्रकार अशा प्रकारचे अनेक माहिती नोंदवता येणार आहे . यामुळे हे ॲप्स आपल्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक असणार आहे , हे ॲप्स डाऊनलोड करण्याकरिता प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी हे नाव टाकून डाउनलोड करावे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *