भाजपच्या या 15 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Phone call to these 15 MLAs of BJP for ministerial posts ] : भारतीय जनता पार्टीच्या या 15 आमदारांना मुख्यमंत्री पदासाठी फोन करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे .  मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील भाजपला 21, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला दहा मंत्रिपदे दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

आज रोजी राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे , यामध्ये भारतीय जनता पार्टी कडून पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 15 आमदारांना मंत्रीपद देण्याकरिता फोन करण्यात आले आहेत . अशा संभाव्य आमदारांची यादी खालील प्रमाणे पाहूयात .

यामध्ये कोकण विभागातील रवींद्र चव्हाण , नितेश राणे , मंगलप्रभात लोढा , आशिष शेलार , अतुल भातखळकर यांना मंत्रीपदासाठी पाचारण करण्यात आले असल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे .

तर पश्चिम महाराष्ट्रातून शिवेंद्रसिंह राजे भोसले, गोपीचंद पडळकर , माधुरी मिसाळ , राधाकृष्ण विखे पाटील  या आमदारांना मंत्रिमंडळामध्ये सामील करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाचरण करण्यात आले असल्याची सूत्रानुसार माहिती समोर येत आहे .

तर मराठवाड्यातून लोकसभेत पराजित झालेल्या परंतू विधान परिषदेमध्ये स्थान मिळालेल्या  पंकजा मुंडे यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यासाठी पाचरण करण्यात आले असल्याची मोठी माहिती समोर येत आहे . याशिवाय मराठवाड्यातून अतुल सावे यांची देखील मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे .

विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे , संजय कुटे यांना स्थान देण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे . तर उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन , जयकुमार रावल यांना स्थान देण्यात येणार आहे .

Leave a Comment