पेन्शनधारकांचा पुण्यात महामेळावा , चला राष्ट्रीय संघर्ष समितीने केले आवाहन ! जाणून घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : खाजगी व सहकारी क्षेत्रामधून जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी व विविध प्रकारच्या मागण्यांसाठी दिनांक आठ जून रोजी गुरुवारी सायंकाळी चार वाजता पुण्यामध्ये आंबेगाव पठार सर्वे नंबर 15 कात्रज डेअरी जवळ चिंतामणी ज्ञानपीठ या ठिकाणी आयोजित केले आहे. अशी महत्वपूर्ण माहिती शेतकरी व कामगार नेते, सोबतच राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रमोद पानसरे यांनी दिले आहे.

राष्ट्रीय संघर्ष समितीचे संस्थापक यासोबतच अध्यक्ष कमांडर माननीय श्री अशोकराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक सुप्रियाताई सुळे असतील. यांच्या शुभहस्ते या संमेलनाचे उद्घाटन होईल. अशावेळी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती देखील असणार आहे. त्यामध्ये युवराज रेणुसे, विजय रेणुसे, राष्ट्रीय संघर्ष समितीचे सचिव वीरेंद्र सिंग राजवत, राष्ट्रीय मुख्य सल्लागार पी एन पाटील, यांच्यासोबतच राष्ट्रीय महिला अध्यक्ष शोभाताई असर, समन्वयक सीएम देशपांडे विलासराव पाटील इत्यादी मान्यवर अशावेळी उपस्थित असतील.

देशांमधील खाजगी सहकारी व औद्योगिक यासोबतच महामंडळ अशा क्षेत्रातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांकरिता ईपीएस पेन्शन योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला कमीत कमी साडेसात हजार रुपये पेन्शन यामध्ये जास्तीत जास्त महागाई भत्ता देणे गरजेचे आहे. या सोबतच सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करावी इत्यादी मागण्यांवर यामध्ये चर्चा केली जाईल.

हे पण वाचा : रजा मंजुरी संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि .07.06.2023

या चर्चेसाठी कमांडर अशोकराव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय संघर्ष समितीच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये सातत्याने संघर्ष केला जात आहे. केंद्र सरकारचे या गोष्टीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी 15 मार्च 2023 रोजी संपूर्ण देशांमध्ये 200 ठिकाणी एकाच दिवशी रस्ता रोको आंदोलन होईल.

तरीही आयोजित केलेल्या महामेळाव्याला सांगली सातारा अहमदनगर पुणे जिल्ह्यामधील खाजगी सहकारी असंघटित औद्योगिक यासोबतच महामंडळ अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणे गरजेचे आहे. राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने हा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment