Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pensioner & Family Pensioners paripatrak ] : निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांमध्ये जनजागृती करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 21 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरचा परिपत्रक हा राज्यतील सर्व लेखा अधिकारी , अधिदान व लेखा कार्यालय ,मुंबई तसेच सर्व जिल्हा परिषदा कोषागार अधिकारी यांच्याप्रती सादर करण्यात आलेले आहेत .

सदरच्या परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील काही कोषागारांमधून निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना अज्ञात व्यक्तींकडून संपर्क साधला जात आहे . ती व्यक्ती निवृत्तीवेतनधारकांना आपणांस सुधारित निवृत्तीवेतनाची फरक रक्कम मिळणार असून त्या अगोदर तुमची वसूली निघत आहे .

ती रक्कम तात्काळ ऑनलाईन भरावी , जेणेकरुन फरकाची रक्कम मिळेल , अशा प्रकारे सांगण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत . काही निवृत्तीवेतनधारकांनी अशा प्रकारच्या कॉलस् ला बळी पडून सदर व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार केला असल्याच्या घटना समोर येत आहेत .

तरी सदर अशा प्रकारच्या घटना इतर जिल्ह्यांमध्ये घडू नयेत याकरीता खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या संबंधित कोषागारामार्फत प्रेसनोटद्वारे निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना जागृत करण्याचे व त्या अनुषंगाने तसेच निवृत्तीवेतन धारक असोसिएशन यांना सूचित करण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक 21 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहू शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *