Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ A memorandum was submitted regarding the revised pension scheme, Asswasit Pragati Yojana, 3% dearness allowance increase and closing the wage gap ] : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना , सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ तसेच वेतन तफावत दुर करणे व वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत , राज्याचे अपर मुख्य सचिव यांच्या प्रति राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांच्या वतीने दि.17.01.2025 रोजी महत्वपुर्ण निवेदन पत्र सादर करण्यात आलेला आहे .

सदर निवदेन पत्रांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त विभागाच्या दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार राज्य शासनांच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या तसेच केंद्र सरकारच्या एकीकृत पेन्शन योजनेच्या शर्ती व अटी विहीत करणे , योजनेची अंमलबजावणी करणे ..

तसेच योजनेचे नियम व कार्यपद्धती निश्चित करण्यास वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आले आहे . सदर बाबतचे शासन परिपत्रक अद्याप पारित झालेले नाही . त्यामुळे दिनांक 01 मार्च 2024 पासुन ते आज पर्यंतच्या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या संदर्भात कोणता योग्य निर्णय घ्यावा याबाबतची संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे .

तसेच त्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन सुद्धा मिळत नसल्याने त्यांची आर्थिक अडचण होत आहे . त्यामुळे सदर विषयीची परिपत्रक सत्वर पारित होणे आवश्यक असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

याशिवाय शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर गृहित धरण्यात आलेल्या पदोन्नती ऐवजी सदरची नियुक्ती गृहीत धरल्यास , तिसऱ्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ , संबंधित ड वर्गातील तळाच्या कर्मचाऱ्यांना होणार आहे , तसेच या विषयीची चर्चा करुन निर्णय घेण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच पदोन्नतीधारक कर्मचाऱ्यांच्या वेतनमानाचा तत्सम विचार न झाल्यामुळे निर्माण झालेली तफावत दुर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे . या शिवाय माहे जुलै 2024 पासूनचा अनुज्ञेय असणारा 3 टक्के वाढीव महागाई भत्ता व तत्अनुषंगिक लाभ मिळण्याची मागणी करण्यात आलेली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *