Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ pension sale meaning and calculation ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर जी निवृत्तीवेतन दिली जाते , त्यातील काही भाग सरकारला परत करून त्याच्या मोबदल्यामध्ये एक ठोक रक्कम घेतली जाते , त्यालाच पेन्शन विकणे अथवा अंशराशीकरण असे म्हटले जाते .
सदर निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतर इच्छा असेल तरच विहित नमुन्यातील अर्ज करून नियत वयोमानानुसार निवृत्त होण्याच्या तीन महिने पूर्वी अथवा निवृत्तीच्या नंतर एक वर्षाच्या आत वैद्यकीय तपासणीशिवाय अंशराशीकरणाची रक्कम दिली जाते . त्या प्रकारचा विहित नमुन्यातील अर्ज संबंधित कार्यालयाच्या मार्फत महालेखापाल यांच्याकडे पाठवण्यात येतो .
जर सदर कर्मचाऱ्यांनी निवृत्तीच्या नंतर एक वर्षाच्या आत मध्ये पेन्शन विक्री बाबतचा अर्ज न दिल्यास , सदर कर्मचाऱ्यास वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागते . परंतु ज्या कर्मचाऱ्यांनी रुग्णता निवृत्तीवेतन घेत असल्यास , सदर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी शिवाय सदर अंशराशीकरण पेन्शन विक्री करता येते . असे निवृत्तीवेतनधारक केव्हाही अंशराशीकरणाचा लाभ घेऊ शकता .
अंश राशीकरणाची गणना : निवृत्तीवेतनाची जी रक्कम असते सदर रकमेच्या जास्तीत जास्त 1/3 एवढीच विकता येते , म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यास 5000/- रुपये निवृत्तीवेतन मिळत असेल तर तो सदर रकमेच्या 5000 X 1/3 = 1667/- एवढा भाग विकू शकतो .
अंश राशीकरण मूल्य काढण्याकरिता : अंश राशीकरणाचा दर X 12 X अंश राशीकृत भाग . ( यामध्ये वयाच्या 58 वर्ष सेवा करून 59 व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याकरिता अंश राशीकरण दर 10.46 इतका आहे ) यानुसार अंश राशीकरणाची मूल्य पुढील प्रमाणे काढता येईल .
= 10.46 X 12 X 1667 = 209241.84/- इतकी रक्कम पेन्शन विक्रीतून मिळेल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.