लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन निमयांमध्ये मोठा बदल करणे बाबत केंद्र सरकारकडून एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या नविन नियमांमध्ये सरकारी कर्मचारी जर सेवेत असताना किंवा सेवेनंतर कोणत्याही गुन्ह्यात दोषी आढळल्याचे सिद्ध झाल्यास अशा कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
माहे जुलै महिन्यांत केंद्र सरकार कडून ऑल इंडिया सेवा ( सेवानिवृत्ती नंतर मिळणारे लाभ ) सेवानियम 1958 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेले आहेत . तसेच भारतीय प्रशासन सेवेतील कार्यरत सरकारी अधिकाऱ्यांचे पेन्शन थांबविणे बाबतचे सर्व अधिकार आता केंद्र सरकारने स्वत: जवळ घेण्यात आलेले आहेत .सेवानिवृत्तीनंतरच्या पेन्शन नियंमांमध्ये बदल करण्यात आल्याने , आता यापुढे सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना कोणत्याही गुन्ह्यांत दोषी आढळणे , व सिद्ध झाल्यास पेन्शन पासून मुकावे लागणार आहेत
नविन नियमांनुसार भारतीय प्रशासन सेवेतील IAS , IFS , IPS अधिकारी एखाद्या विशिष्ट गंभीर गुन्ह्यात दोषी झाल्याचे सिद्ध झाल्यास अशा अधिकाऱ्यांची पेन्शन थांबविण्याचे अधिकार केंद्र सरकारला असणार आहेत . भारतीय प्रशासन सेवेत ह्या वरील नोकऱ्या सर्वात जास्त प्रतिष्ठित नोकऱ्या समजल्या जात असतात . परंतु सदर अधिकाऱ्यांकडून अनेकवेळा काही नियमांचे बंधन पाळले जात नसल्याने , सदरचा निर्णय अंमलात आणण्यात आलेला आहे .
यापुर्वी एखादा अधिकारी हा दोषी आढल्यास त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याकरीता संबधित राज्य सरकारची पुर्व परवानगी केंद्राला घ्यावी लागत असत , परंतु आता सुधारित नियमांनुसार केंद्राला अधिकारी सेवा बजावत असलेल्या राज्य सरकारच्या पुर्व परवानगी शिवायच कार्यवाही करता येणार आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , एखादा अधिकारी उदा – ईडी , इंटलिजन्स ब्युरो त्याचबरोबर इतर विभागात काम करणाऱ्या निवृत्त अधिकारी सेवेत असताना किंवा निवृत्तीनंतर कोणत्याहे साहित्य प्रकाशित करु शकणार नाहीत ,ज्यामुळे भारत देशाची संवेदनशील माहिती सार्वजनिक उघड होईल , किंवा सुरक्षेसाठी धोका ठरु शकेल असा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये समावेश करण्यात आलेले आहेत . अशा प्रकरणी केंद्राकडून संबंधित अधिकाऱ्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेवू शकेल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !