राज्यातील सन 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागु करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान दिले आहेत .सदर नविन पेन्शन प्रणालीची तरतुद येत्या अर्थसंकल्पांमध्ये करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आलेले आहेत .
जुनी पेन्शन ऐवजी नविन पेन्शन प्रणाली : राज्य शासनांकडून जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येईल याची खुप कमी शक्यता आहे , त्यामुळे जुनी पेन्शन योजना ऐवजी नविन पेन्शन प्रणाली लागु करण्यात येईल . मिडीया रिपोर्टच्या मिळालेल्या माहितीनुसार , कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी नुसार पेन्शन अदा केली जाईल .कर्मचाऱ्यांची सेवा व शेवटच्या मुळ वेतनाच्या किती टक्के रक्कम पेन्शन स्वरुपात मिळेल याबाबत सविस्तर तक्ता पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | सेवा कालावधी | शेवटच्या मुळ वेतनाच्या मिळणारी रक्कम ( टक्के मध्ये ) |
01. | 30 वर्षापेक्षा अधिक | 50 टक्के |
02. | 20 ते 30 वर्षे पर्यंत | 40 टक्के |
03. | 20 वर्षे पर्यंत | 35 टक्के |
वरील तक्त्याप्रमाणे , 30 वर्षे पेक्षा अधिक , 20 ते 30 वर्षे पर्यंत व 20 वर्षापर्यंत सेवा कालावधीनुसार ,अनुक्रमे शेवटच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के , 40 टक्के व 35 टक्के रक्कम पेन्शन म्हणून अदा करण्यात येईल ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.