Spread the love

Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Stike update ] : वार मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी नागपुर येथे होणाऱ्या पेन्शन जनक्रांती महामोर्चास संस्था / महाविद्यालयातील तसेच शाळांमधील कर्मचारी पाठविणेबाबत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला असून सदर पत्रकांमधील आशय पुढीलप्रमाणे पाहु शकता …

जुनी पेन्शन संघटनेने महाराष्ट्र भरातील शिक्षक कर्मचाऱ्यांसह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागु करयात यावी म्हणून दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी नागपुर येथे पेन्शन जनक्रांती महामोर्चा चे आयोजन केलेले आहेत . मागील वर्षी पेन्शन संघटनेने दि.27 डिसेंबर 2022 रोजी नागपुर येथे जवळपास दोन ते अडीच लाख लोकांना यशस्वी मार्चाचे आयोजन केले हेाते .

सदरच्या आंदोलनाची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने सन 2005 नंतर शासन सेवेत असताना मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंब निवृत्तीवेतन व ग्रॅज्युटी मंजूर केलेली आहे . हे संघटनेने मागील 10-12 वर्षात केलेल्या शेकडो संघर्षमय आंदोलनाचे फलित आहेत . जुनी पेन्शन योजना हा मुद्दा राजकिय मुद्दा झालेला असून , राष्टीय जुनी पेन्शन संघटनाच्या माध्यमातुन देशभर जुनी पेन्शन आंदोलनाचा वानवा पेटलेला आहे .

केंद्र व राज्य शासनाने  कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतलेली आहे , जुनी पेन्शन लढा अंतिम टप्यात येवून ठपला असून मोठ्या कर्मचारी संख्येने लढा तीव्र करण्यासाठी , राज्यातील विविध संस्थामधील सर्व एनपीएस कर्मचाऱ्यांना नागपुर येथे होणाऱ्या जनक्रांती महामोर्चात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने पाठविण्याची विनंती सदर प्रसिद्धीपत्रकांमध्ये करण्यात आलेली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *