Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pension demand complet from central govt. see news ] : एनडीए सरकारला लोकसभा निवडणुकांमध्ये हवे तसे यश संपादन झाले नाही . याचे एक कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मुद्द्यावर तोडगा न काढणे . यामुळे आता केंद्र सरकारकडून पेन्शन वादावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भुमिका घेत आहेत .

सोमवारच्या दिवशी दिल्ली येथे कर्मचारी संघटना व वित्त मंत्रालयासोबत पेन्शच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून , येत्या अर्थसंकल्पांमध्ये पेन्शनच्या वादावर तोडगा काढण्यात येणार असल्याची नमुद करण्यात आले असल्याची माहीती सुत्रांनी सांगितले आहेत . यांमध्ये एनपीएस कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के इतकी रक्कम पेन्शन म्हणुन देण्याचा पर्याय उपलद्ध करुन देण्यात येणार आहेत .

म्हणजेच एखादा कर्मचाऱ्यास निवृत्तीच्या वेळी 50,000/- रुपये इतके मुळ वेतन दिले असेल , तर त्यास पेन्शन म्हणुन 25,000/- रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात येणार आहे .यांमध्ये कर्मचारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजनाच पुढे लागु करण्याची मागणी कायम ठेवण्यात आलेली आहे . कारण जुन्या पेन्शन मध्ये आर्थिक लाभासह सामाजिक सुरक्षा प्रदान होते .

देशांमध्ये आगामी 3-4 महिन्यांमध्ये बऱ्याच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत , त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सदर निवृत्तीवेतन बाबतचा महत्वपुर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे अंतर्गत मुंबई, भुसावळ, नागपूर,सोलापूर, पुणे येथे महाभरती ; लगेच करा आवेदन!

अर्थसंकल्पांमध्ये निर्णयाची शक्यता : केंद्र सरकारचे दिनांक 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे , यांमध्ये एनपीएस धारकांना अंतिम वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याच्या प्रस्तावर निर्णय होण्याची शक्यता आहे . यामुळे एनडीए पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *