Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ pending bill paid before 25.09.2024 paripatrak] : कर्मचाऱ्यांची थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करणे संदर्भात माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दिनांक 12.09.2024 रोजीच्या संदर्भातील पत्रानुसार जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत दिनांक 20.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार सदर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी / केंद्रप्रमुख सेवानिवृत्त मयत कर्मचारी यांचे 06 व सातवा वेतन आयोगाचा फरकाचा हप्ता तसेच पदोन्नती वेतन वाढ , निवड श्रेणी , वरिष्ठ श्रेणी , शिक्षण सेवक मानधन भत्ता फरक , निलंबन / बडतर्फ कालावधी फरक न्यायालयीन प्रकरणे / नियमित वेतनश्रेणी फरक व इतर सर्व प्रकारचे वेतन संबंधित थकबाकी देखील शालार्थ प्रणाली मधून दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे संदर्भात जिल्हा स्तरावरून थकीत देयके ऑनलाइन सादर करणे बाबत शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी च्या संदर्भातील परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आले आहेत .
सदर परिपत्रकाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती हायस्कूल अंतर्गत सेवानिवृत्त झालेले शिक्षक , केंद्रप्रमुख कर्मचारी यांचे कार्यरत सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी केंद्रप्रमुख सेवानिवृत्त मयत कर्मचारी यांचे 06 व सातवा वेतन आयोगाचा फरकाचा हप्ता , पदोन्नती वेतनवाढ , निवड श्रेणी , वरिष्ठश्रेणी , शिक्षण सेवक मानधन , महागाई भत्ता फरक , निलंबन / बडतर्फ कालावधी फरक , न्यायालयीन प्रकरणे नियमित वेतनश्रेणी फरक व इतर थकबाकी देयके …
तसेच माहे जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंतचे महागाई भत्ता फरकाचे देयके शालार्थ प्रणाली (shalarth ) मधून शालार्थ – 02 या टॅब मधील pending बिल या सुविधेचा उपयोग करून , जिल्हास्तरावर ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा समन्वयकांना देण्यात आली आहेत .
त्याचबरोबर सहावा व सातवा वेतन आयोगाचा हप्ता व महागाई भत्ता थकबाकीचे ऑनलाईन सादर करण्याचे सूचना देण्यात आले आहेत . त्याचबरोबर सदर परिपत्रकानुसार एकही शिक्षक किंवा केंद्रप्रमुख यांचे कुठल्याही प्रकारची थकबाकी राहणार नाही , याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आली आहेत .