Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , शासन निर्णय : सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते या उद्दिष्टाकरीता 2401,0314,36 सहायक अनुदाने ( वेतन ) या घटकासाठी पुरवणी मागणीद्वारे मंजुर निधी उपलब्ध करुन देणेबाबत राज्य शासनांच्या कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागांकडून दिनांक 05.09.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणा , अकोला यांनी सन 2019 -20 पासून महसुली उत्पन्नात घट झाली असल्या कारणाने तसेच सातवा वेतन आयोगामुळे यंत्रणेच्या खर्चात वाढ झालेली असल्याने यंत्रणेमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते यावरील खर्च भागविण्यासाठी सन 2022-23 व सन 2023-24 करीता 12.80 कोटी इतके सहायक अनुदानाची मागणी लेखाशिर्ष 2401 0314 साठी निधी मंजुर करण्याचा विचार विचाराधीन होता .

यानुसार आता महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणिकरण यंत्रणा अकोला येथील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन /भत्ते यावरील खर्च भागविण्याकरीता लेखाशिर्ष 2401 0314 ,36 , सहायक अनुदाने ( वेतन ) या घटकासाठी जुलै 2023 च्या विधानमंडळाच्या अधिवेशनांमध्ये पुरवणी मागणी द्वारे रुपये 12.80 कोटी इतका निधी मंजुर करण्यात आलेला आहे . सदर निधीपैकी सन 2022-23 करीता रुपये 5.07 कोटी व सन 2023-24 करीता रुपये 3.87 कोटी असा एकुण 8.94 कोटी इतका निधी वितरीत करण्यास  मान्यता देण्यात येत आहे .

सदरचा निधी महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणा अकोला यांना आयुक्त ( कृषी ) , कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . तसेच यंत्रणेस आलेले उत्पन्न व बाबनिहाय केलेला खर्च व उत्पादनाचा तपशिल प्रत्येक महिना संपल्यानंतर शासनास त्यांचे अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात वेतन / भत्ते अदा करणे संदर्भात दिनांक 05.09.2023 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR )

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *