Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay Leave For All Employee ] : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – 2024 करीता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरीता सुट्टी देणेबाबत , उद्योग , उर्जा , कामगार व खनिजकर्म विभागांकडून दिनांक 22 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
भारत निवडणुक आयोगाने दिनांक 16.03.2024 रोजी निर्गमित केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार राज्यात लोकसभा निवडणुक 2024 चे मतदान राज्यात दिनांक 19.04.2024 , दिनांक26.04.2024 , दि.07.05.2024 , दि.13.05.2024 व दि.20.05.2024 अशा पाच टप्यांमध्ये मतदान होणार आहे . याकरीता भारत निवडणुक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असणाऱ्या कामगार / अधिकारी / कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश आहेत .
सदरची भरपगारी सुट्टी ही राज्यातील उद्योग विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व कंपन्या व संस्था , औद्योगिक उपक्रम , तसेच उद्योग समुहे , महामंडळे अथवा इतर सर्व आस्थापना यांना लागु असणार आहे . यांमध्ये अपवादात्मक परिस्थितीत कामगार , कर्मचारी / अधिकारी यांना सुट्टी देणे शक्य नसल्यास तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल , असे आदेशित करण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयातील सुचनांचे राज्यातील सर्व महामंडळे , कंपन्या , संस्था ,औद्योगिक उपक्रम इ. आस्थापनांनी काटेकोरपणे अनुपालन होईल याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . जर मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुटी अथवा दोन तासांची सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत , तक्रार आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल असे निर्देशित करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात उद्योग , उर्जा , कामगार व खनिजकर्म विभागांकडून दिनांक 22 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय ( GR ) पुढीलप्रमाणे पाहु शकता ..