Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay Commission & Paymet Increase ] : स्वातंत्र्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पहिला वेतन आयोग लागू करण्यात आलेला होता , त्यानंतर सर्वसाधारणपणे 10 वर्षांच्या अवधीनंतर नविन सुधारित वेतन आयोग लागु करण्यात आला आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत लागु करण्यात आलेले वेतन आयोग व वेतनातील वाढ संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पहिला वेतन आयोग हा स्वातंत्र्यानंतर लागु करण्यात आलेला होता , ज्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये 40 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे . त्यानंतर सन 1959 मध्ये दुसरा वेतन आयोग लागु करण्यात आला ज्यांमध्ये वेतनात तब्बल 50 टक्के इतकी वाढ लागु करण्यात आली . तर त्यानंतर तिसरा वेतन आयोग हा 1973 मध्ये लागु करण्यात आला ज्यात वेतनात 25 टक्के इतकी वाढ लागु करण्यात आली .

तर चौथा वेतन आयोग हा 1986 साली लागु करण्यात आला असून , ज्यांमध्ये वेतनात 35 टक्के इतकी वेतनवाढ लागु करण्यात आली . तर पाचवा वेतन आयोग हा 1996 साली लागु करण्यात आला असून , वेतनात 35 टक्के इतकी वाढ लागु करण्यात आली . तर त्यानंतर सहावा वेतन आयोग हा सन 2006 साली लागु करण्यात आला असून , वेतनांमध्ये 40 टक्के इतकी वाढ लागु करण्यात आली .

तर विद्यमान सातवा वेतन आयोग हा सन 2016 मध्ये लागु करण्यात आला असून , वेतनांमध्ये 14 टक्के इतकी वाढ लागु करण्यात आली . वरील वेतन आयोगाचा आढावा घेतला असता , सर्वात कमी पगार वाढ ही सातव्या वेतन आयोगानुसार लागु करण्यात आली आहे .

वेतन आयोग / वेतनातील वाढ व कोणत्या पक्षाची सत्ता होती या संदर्भातील सविस्तर चार्ट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

वेतन आयोगपगारवाढकोणत्या पक्षाची सत्ता
पहिला वेतन आयोग40 टक्केकाँग्रेस
दुसरा वेतन आयोग  सन 195950 टक्केकाँग्रेस
तिसरा वेतन आयोग   सन 197325 टक्केकाँग्रेस
चौथा वेतन आयोग      सन 198640 टक्केकाँग्रेस
पाचवा वेतन आयोग   सन 199635 टक्केकाँग्रेस
सहावा वेतन आयोग    सन 200640 टक्केकाँग्रेस
सातवा वेतन आयोग     सन 201414 टक्केभाजप

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *