Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pavitra Portal Teacher Recruitment For Private Education Society ] : पवित्र पोर्टलमार्फत खाजगी शैक्षणिक संस्थामधील रिक्त पदांवर पदभरती करीता राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती नोंदविणेबाबत , राज्य शासनांच्या शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , कि https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावर जाहीरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत करणेबाबत , सुविधा देण्यात आलेल्या होत्या .

सद्यस्थितीमध्ये संकेतस्थळावर जाहीरात देण्याची कार्यवाही अद्याप सुरु असून , सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांना पदभरती करीता जाहीरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत सुविधा देण्यात येत आहेत .

यामुळे राज्यातील शासनांच्या अधिनस्त नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना पदभरती करीता जाहीरात देण्याविषयक मुदतवाढ देण्यात आली असल्याच्या सविस्तर सूचना देणेबाबत , सदर परित्रकानुसार शिक्षण सहसंचालक यांच्यामार्फत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक , शिक्षणाधिकारी , पालिका , शिक्षणधिकारी , शिक्षण निरीक्षक , तसेच प्रशासन अधिकारी यांना सूचित करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेतन , सदर बाबीस सर्व माध्यमांतून विस्तृत प्रसिद्धी देण्यात यावेत , याबाबत सदर परिपत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *