Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pavitra Portal Teacher Recruitment new Update ] : राज्यात सध्या पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षकांची पदभरती करण्याात येत आहेत , यांमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील भावी गुरुजींचा खुप हैराण झालेले आहेत , परंतु सदर भावी शिक्षकांना राज्य शासनांकडून दिलासा देत पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे .

शिक्षक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देण्यासाठी दिनांक 06 फेब्रुवारी 2024 पासुन सुरुवात झालेली आहे , परंतु पोर्टल सुरळीत चालत नसल्याचे तक्रार ( हेल्पलाईन ) उमेदवारांकडूर ई-मेलवर तक्रारींचा पाऊसच पाडला . यामुळे प्रशासनांकडून याकडे लक्ष घालत पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . सध्या ई-मेल आलेल्या तक्रारीपैकी सर्वात जास्त तक्रारी ह्या पोर्टल सुरळीत चालत नसल्याच्या तक्रारी आहेत .

उमेदवारांच्या तक्रारींचा विचार करता आता राज्यातील भावी शिक्षकांना पसंतीक्रम देण्याकरीता दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी गुरुवारी परिपत्रक काढून माहिती दिली आहे . यापुर्वी ही सुविधा ही दिनांक दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत देण्यात आलेली होती , परंतु आता दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत दिल्याने उमेदवारांना दिला प्राप्त झालेला आहे .

मंगळवारी तब्बल 57,000 उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले होते , तर तब्बल 163,000 उमेदवारांनी टेट -2022 परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी स्व -प्रमाणपत्र प्रमाणित करुन घेतले आहेत . सध्याच्या शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांची संख्या ही लाखोंच्या घरात असणार असल्याने , गुणानुक्रमे उमेदवारांची मोठी चुरशी लागणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *