Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pashusanvardhan Yojana ] : पशुसंवर्धन योजनांच्या अंतर्गत दुधाळ जनावरे / पक्षी खरेदी करण्याकरीता बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत सुलभ कर्जे उपलब्ध करुन दिले जाते , या संदर्भातील सविस्तर माहिती व पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पशुसंवर्धन योजनेचे मुख्य उद्देश : या योजना अंतर्गत शेतकरी / शेतमजुर इतर सर्वांसाठी दुधाळ जनावरे जसे गायी म्हशी इ . तसेच बैल / उंट , पोल्ट्री – ब्रॉयलर / स्तरीय फार्म , हॅचरी , फीड मिल , मेंढी / शेळी खरेदी करण्यासाठी तसेच बायचे बांधकाम , उपकरणे / यंत्रसामग्री खरदे इतर भांडवलीची आवश्यकता करीता मुदत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते .
आवश्यक पात्रता ; या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी यांमध्ये वैयक्तिक तसेच संयुक्त भुधारक तसेच भाडेकरुन शेतकरी , शेअर पट्टेदार , ओरल लीसेस तसेच जेएलजी शेतकरी कर्ज घेण्यास पात्र ठरतील ..
उपलब्ध कर्ज / व्याजदर : या योजनांतर्गत प्राणी नाबार्डच्या युनिट किमतीनुसार कर्जे उपलब्ध करुन दिले जाते , तसेच इतर प्रकल्प करीता किंमत कोटेशन नुसार कर्ज उपलब्ध करुन दिले जाते , यांमध्ये 10 लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर 1 वर्ष MCLR + BSS @0.50% +2.00% टक्के इतके व्याजदर तर 10 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जावर 1 वर्ष MCLR + BSS @0.50% +3.00% टक्के इतके व्याजदर आकारण्यात येते .
परफेड कालावधी : सदर कर्ज परतफेडीचा कालावधी हा 3 ते 7 वर्षांच्या आत इतका आहे . तर परतफेडी ही मासिक / तिमाही तसेच अर्ध वार्षिक पद्धतीने करता येईल .
आवश्यक कागतपत्रे : सदर योजनांच्या माध्यमातुन कर्ज घेण्यासाठी 7/12 , कर्जाचा नमुना , बी -2 , 6 डी माहिती , अर्जदाराची चतु : सिमा , गहाण पत्र , इतर परवानग्या , नादेय प्रमाणपत्र इ.
अर्ज कसा कराल ? : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्याकरीता आपल्या जवळ असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेस भेट देवून या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेवू शकता ..