Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pashupalan Loan ] : यापुर्वी दुग्धव्यवसाय करण्याकरीता जनावरे ( गायी / म्हशी ) खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंत कर्जे देण्यात येत होते , आता यांमध्ये वाढ करण्यात आलेली असून सदर पशुपालन नविन योजना अंतर्गत रक्कम वाढविण्यात आलेली असून 5 लाख रुपये वरुन 12 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे .
आजकाल बरेच शेतकरी हे शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करीता आहेत . ज्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळतो . पशुपालन करण्याकरीता पशुंची खरेदी करण्याकरीता नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ( NABARD ) मार्फत कर्जे देण्यात येते , यापुर्वी जनावरांच्या खरेदी करणे व डेअरी युनीट सुरु करण्याकरीता पाच लाख रुपये पर्यंत कर्जे उपलब्ध करुन देण्यात येत होते .
परंतु आता नविन योजना नुसार सदर रक्कमे मध्ये वाढ करण्यात आलेली आहे , कारण वाढत्या मागणीनुसार पशुची खेरदी व डेअरी युनिट करीता 5 लाख रुपये पुरेसे नसल्याने सदर योजना अंतर्गत 12 लाख रुपये कर्जे स्वरुपात शेतकऱ्यांना / शेतमजुर यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत .
तर नाबार्ड मार्फत डेअरी युनिट उभारणी करण्याकरीता मिळणरे अनुदान यांमध्ये आता 25 टक्क्यांवरुन पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे , ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना या योजना अंतर्गत लाभ प्राप्त होणार आहे . या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना तब्बल 50 टक्के पर्यंत सबसिडी देण्यात येत असते .s पशुपालनला अधिकाधिक चालना देण्याकरीता कर्जे रक्कमांमध्ये वाढ करण्यात आलेले आहे .
व्याज व टक्केवारी : सदर योजना अंतर्गत वार्षिक 6.5 टक्के ते 9 टक्के व्याजदराने दहा वर्षांच्या मुदतीकरीता 12 लाख रुपये पर्यंत कर्जे उपलब्ध करुन दिले जाते , यांमध्ये SC / ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना 33.33 टक्के पर्यंत सबसिडी तर इतर लाभार्थ्यांना 25 टक्के पर्यंत सबसिडी देण्यात येते .
आवेदन कसा कराला : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता आपल्या जवळच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल , ज्यांमध्यहे आपल्याला संपुर्ण माहिती मिळेल , बँकेत परिपुर्ण फॉर्म भरल्यानंतर आपणास या योजना अंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते . या विषयक अधिक माहितीकरीता नाबार्डच्या हेल्प लाईन नंबर 022-265639895 /96/99 या नंबरवर संपर्क साधावा ..