Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी punjabrao dakh ] : दिनांक 4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुका 2024 चा निकाल जाहीर झाला आहे , यामध्ये राज्यात 48 मतदारसंघात करिता निवडणूक रिंगणामध्ये एकूण 1121 उमेदवार उभे होते , त्यापैकी तब्बल 1025 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे , यामध्ये अनेक लोकप्रिय नेत्यांचा समावेश आहे .
पंजाबराव डख : शेतकऱ्यांना नियमितपणे हवामानाचा अंदाज देणारे हवामान तज्ञ पंजाबराव डख हे परभणी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उभे होते , त्यांना वंचित बहुजन आघाडी मार्फत उमेदवारी देण्यात आली होती . परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये मराठा चेहरा म्हणून पंजाबराव डख यांना प्रकाशराव आंबेडकर यांच्याकडून उमेदवारी जाहीर केली होती परंतु , या निवडणुकीमध्ये पंजाबराव डख हे एक लाख देखील मत घेऊ शकले नाहीत .
यामुळेच पंजाबराव यांचा डिपॉझिट जप्त झाले आहे , शेतकऱ्यांना नियमितपणे हवामानाचा अंदाज देत असतात , त्यामुळे त्यांचे लोकप्रियता शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे . यामुळेच आपला विजय निश्चित असल्याचा त्यांना खात्री होते , परंतु शेतकऱ्यांनी पंजाबराव यांना तिसऱ्या स्थानावर पसंती दिली , परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये संजय जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभे होते, त्यांचा विजय झाला तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून महादेव जानकर उभे होते ते दुसऱ्या स्थानावर तर पंजाबराव उत्तमराव डख यांना 95,967 इतकी मत मिळाल्याने ते तिसऱ्या स्थानावर राहिले .
जे की एकूण मतदानाच्या 1/6 टक्के मत घेवू न शकल्याने , त्यांचे डिपॉझिट रक्कम जप्त झाली आहे . परभणी लोकसभा मतदार संघामध्ये विजयी उमेदवार संजय जाधव व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचेच डिपॉझिट सुरक्षित राहिले बाकीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे .
डिपॉझिट रक्कम किती असते ? : लोकसभा निवडणुका करिता अनामत रक्कम म्हणून उमेदवारांकडून 25 हजार रुपये अर्ज भरताना घेतली जाते , तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता 50 टक्के सूट दिली जाते , म्हणजेच सदर संवर्गातील उमेदवारांना 12,500/- रुपये इतकी अनामत रक्कम भरावी लागते.