HMPV : चीन देशातुन एचएमपीव्ही या साथरोगाचा उद्रेक ; श्वसनावर तीव्र परिणाम ! राज्य शासनांकडून परिपत्रक निर्गमित !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Outbreak of HMPV epidemic from China ] : चीन देशातुन आणखीन एका साथरोगाचा उद्रेक झाला आहे , सदर रोगापासुन संरक्षण करीता महाराष्ट्र शासनांकडून 03 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत .

सध्या चीन देशामध्ये HPMV उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत . मानवी मेटान्युमोव्हायरस तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे . हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये सन 2001 मध्ये आढळून आला . त्यानंतर मानवी मेटान्युमोव्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे , ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागावरील संसर्गास (सर्दीसाखारख्या ) काणीभूत ठरते .

हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यत : आरएसव्ही व फ्लुप्रमाणेच हिवाळा व उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो . या अनुषंगाने डीजीएचएस व संचालक एन सी डी.सी दिल्ली यांनी दिनांक 03.01.2025 रोजी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहेत .

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार , वर्ष 2023 च्या तुलनेत माहे डिसेंबर 2024 मध्ये रुग्णांची ( साथीची ) कोणतीही वाढ झालेली नाही . तथापी खबरादीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्याकरीता काय करावे व काय करु नयेत या संदर्भातील सूचना देण्यात आलेल्या आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहू शकता .

हे करा : जेव्हा खोकला / शिंका येत असेल , तेव्हा तोंड व नाक रुमाल अथवा टिश्यू पेपरने झाकावेत .साबण व पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत . ताप खोकला व शिंका येत असल्यास , सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावेत . भरपुर पाणी प्यावेत , व पौष्टिक अन्न खावेत . संक्रमण कमी करण्याकरीता सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजय होईल याची दक्षता घ्यावी .

हे करु नयेत : हस्तांदोलन करु नयेत , तसेच टिश्यु पेपर व रुमालाचा पुनर्वापर टाळावेत , आजारी लोकांशी जवळचा संपर्क करुन नयेत , डोळे , नाक व तोंडाला वांरवार स्पर्श करु नयेत . सार्वजनिक ठिकाणी थुंकु नयेत , डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेवू नयेत .

या संदर्भातील सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत..

HMPV परिपत्रक

Leave a Comment