जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे दि.01 ऑगस्ट ते 09 ऑगस्ट पर्यंत घंटी बजाओ अभियान !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : जुनी पेन्शनच्या मागणीकरीता देशातील कर्मचारी आता एकवटले आहेत , दिनांक 02 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे देशभरातील NPS धारक कर्मचारी 1982-83 ची जुनी पेन्शन मिळावी याकरीता महा-आंदोलन करणार आहेत , या आंदोलनास देशभरातुन कर्मचारी जात आहेत . या दरम्यान देशभरांमध्ये घंटी बजाओ अभियान सुरु असणार आहे .

घंटी बजाओ अभियान ( Ghanti Bajao Abhiyan ) :  नॅशनल मूवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम संघटनामार्फत देशातील सर्व सरकारी कर्मचारी एकवटले असून , संघटनांच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे कि दिनांक 01 ऑगस्ट ते 09 ऑगस्ट 2023 दरम्यान देशांतील सर्व तालुके / जिल्हे मधील सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या-त्या मतदारसंघातील आमदार – खासदार यांना निवेदने देवून घंटी वाजविले जाणार आहेत .

दिल्ली येथे दिनांक 02 ऑगस्ट 2023 रोजी शंखनाद रॅली आयोजित करण्यात आली आहे , त्या पार्श्वभूमीवर देशांमध्ये सर्वत्र ठिकाणी घंटी बजाओ अभियान सुरु ठेवण्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे .जर जुनी पेन्शन योजना लागु न केल्यास , आगामी काळातील निवडणुकींमध्ये Vote For OPS ( Old Pension ) अशी मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती आमदार – खासदार यांना यावेळी दिली जाणार आहे .

हे पण वाचा : ऑगस्ट वेतन : सातवा वेतन आयोगाचे उर्वरित पहिला , दुसरा , तिसरा व चौथा हप्त्याची रक्कम ऑगस्ट महिन्यांच्या वेतनासोबत मिळणार !

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये बदल करणेबाबत , समिती गठित करण्यात आलेली आहे , जे कि सरकारी कर्मचाऱ्यांना मान्य नाही . जुनी पेन्शन योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल न करता लागु करण्याची मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे .

जुनी पेन्शन योजनांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी ( शेवटचे वेतन ) मिळणारे वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळत असते यावर महागाई भत्ताचा अनुज्ञेय करण्यात येत असतो , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर देखिल मोठी रक्कम पेन्शन स्वरुपात मिळत असते .

हे पण वाचा : पोस्ट ऑफिसची भन्नाट बचत योजना! या योजनांमध्ये गुंतवणूक करा, कमी वेळेत मिळेल जास्तीचा परतावा;

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment