Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Onion Export Update News ] : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे , या निर्णयानुसार देशातील तब्बल 99 हजार 150 मेट्रिक जन इतका कांदा सहा देशांना निर्यात करण्याचा मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे , यामुळे आता कांद्याला चांगला मिळणार आहे .
यांमध्ये बांगलादेश , युएई , भुतान , मॉरशिअस , श्रीलंका , बहरिन या देशांना कांदा विक्रीकरीता परवानगी देण्यात आलेली आहे . लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर असताना , केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीला परवानगी दिल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे . यांमुळे आता कांदाच्या भावांमध्ये तेजी येण्याची मोठी शक्यता आहे .
राज्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात कांदाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते , कांद्यावरील निर्यात बंदी उठविल्यास , निश्चितच कांदाला चांगला भाव मिळतो . याशिवाय केंद्र सरकारने गुजरात मध्ये पिकणारा पांढरा कांद्याला निर्यात करण्यास यापुर्वीच परवानगी देण्यात आलेली आहे . पांढरा कांदा हा युरोपिक तसेच पुर्वीय देशांमध्ये विक्रीकरीता उत्पादन केला जातो , या कांद्याला चांगला भाव मिळतो , त्याचप्रमाणे या कांद्याचा उत्पादन खर्च देखिल अधिक आहे .
गुजरात मधील पांढरा कांद्याला निर्यातीस परवानगी दिल्याच्या नंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत होती , यामुळे आता केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवरील निर्यात बंदी उठवून कांदा भाव वाढीस प्रोत्साहन दिले आहेत .
देशांतर्गत कांदाचा भाव स्थिर रहावा , याकरीता कांद्याच्या निर्यातीवर तब्बल 40 टक्के इतका निर्यात शुल्क माहे ऑगस्ट 2023 मध्ये लावण्यात आले होते , यामुळे निर्यातबंदी कायम होते , निर्यातबंदी उठविल्याने , निर्यात शुल्क देखिल हटविण्यात आलेले आहेत .