पुढील शैक्षणिक वर्षापासून , राज्यातील पहिली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळांसाठी एकच नियम ; GR निर्गमित दि.20.12.2024

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ One rule for all schools from 1st to 8th in the state ] : राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळांसाठी एकच नियम लागू करण्यात आला आहे . सदर नियमाची अंमलबजावणी करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार  सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांना मोफत गणवेश योजनाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे . मोफत गणवेश योजना अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येणार असून , केंद्र सरकारने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे .

“एक राज्य एक गणवेश ” या संकल्पनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना एकसारखे 02 गणवेश देण्यात येणार आहेत . विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचनाही आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट अशी असणार आहे . तर विद्यार्थिनी करिता गणवेशाची रचना आकाशी रंगाच्या बाह्या असणारा गडद निळ्या रंगाचा पिको फ्रॉक , आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थिनींना सलवार-कमीज असा गणवेश असेल , तर गडद निळ्या रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज अशी असावी असे नमूद करण्यात आली आहे .

विद्यार्थिनींना केंद्र सरकारने निश्चित केलेल्या गणवेशाचे रकमेमध्ये राज्य शासनाने निर्धारित केलेल्या रंगानुसार इयत्ता निहाय पिको फ्रांक , शर्ट स्कर्ट , सलवार-कमीज देण्याचा निर्णय सदर योजने अंतर्गत “एक राज्य एक गणवेश ” योजनाची अंमलबजावणीची जबाबदारी संबंधीत शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता Click Here

Leave a Comment