Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ one Nation one Election dhoran] : देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेच्या माध्यमातून मोठा महत्त्वपूर्ण क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलेला आहे . काल दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकारच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री मंडळ बैठकीमध्ये सदर एक देश एक निवडणूक या संकल्पनेला मंजुरी दिली आहे .
एक देश एक निवडणूक : एक देश एक निवडणूक या संकल्पनेमध्ये एकाच वेळी निवडणुका घेतले जाते , जसे की विधानसभा , लोकसभा निवडणुका एकदाच पार पाडल्या जातील . त्यामुळे सरकारचे पैसे त्याचबरोबर मनुष्यबळ तसेच वेळ देखील वाचेल . तसेच सदर संकल्पनेला केंद्र सरकारकडून मान्यता दिली आहे .
या संकल्पनेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थन देत म्हणाले कि, सदर एक देश एक इलेक्शन ही संकल्पना अधिक महत्त्वपूर्ण असून , या संकल्पनेच्या माध्यमातून सरकारचे वेळ , पैसा तसेच श्रम वाचणार आहेत . त्याचबरोबर वारंवार निवडणुकामुळे आचारसंहिता लागते , त्यामूळे विकास कामे रखडले जातात . तर वन नेशन वन इलेक्शन मुळे सदर विकास कामे अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे .
सदर निर्णयाचे विरोधी पक्षाकडून विरोध होत आहे , परंतु सदरचा विरोध करणे अयोग्य असल्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे . केंद्र सरकारकडून वेळोवेळी जनतेच्या हिताकरिता निर्णय घेतले जातात , यामुळे सदरचा निर्णय देशातील जनतेकरिता अधिक फायदेशीर ठरणार आहे , असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले आहे .
सदर वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना सरकारच्या दृष्टीने तसेच मतदारांच्या दृष्टीने देखील अधिक सोयीची ठरणार आहे . कारण वारंवार होत असणाऱ्या निवडणुका आता एकाच वेळी पार पडले जाणार आहेत , यामध्ये लोकसभा , विधानसभा त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकाच वेळी घेतले जाणार आहेत .जसे की सध्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आले आहेत , त्याचवेळी सदर धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतले जातील .