Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ one day leave for voting Shasan Nirnay] : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देणे संदर्भात उद्योग ऊर्जा कामगार व खनीकर्म विभागाकडून दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयानुसार 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे ही बाब लक्षात घेता , मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा , याकरिता भर पगारी सुट्टी देण्यात येते , किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते . मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की , संस्था / आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाही . यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागते , जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे .
यामुळे भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या प्रसिद्ध पत्रकामध्ये महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे , सदर निवडणुकीचे मतदान दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे .
सदर निर्णयानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात व्यापारात किंवा कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असणारे आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल . सदर सुट्टी उद्योग विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग , समूह , महामंडळे कंपन्या व संस्था औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे .
सध्याचा निर्णय राज्यातील सर्व खाजगी महामंडळे उद्योग समूह कंपन्या इत्यादिना लागू राहणार असल्याने , सदर नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याची खबरदारी देण्यात आली आहे . जर मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्या विरोधात योग्य ती कार्यवाही केली जाईल असे नमूद करण्यात आले आहे .