Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension & teacher demand nivadan ] : सन 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना सन 1982 प्रमाणाची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागु करण्यात यावी , यांमध्येच कर्मचारी आणि शासनाचे हित आहे . DCPS , NPS व जीपीएफ यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी व शासनांच्या आर्थिक बजेट साठी 1982 ची जुनी पेन्शन योजना हीच देणे गरजेचे आहेत , याबद्दल अनेक चर्चा व अभ्यास झालेला आहे .
तरी ती समस्या लवकरात लवकर सोडून सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि ती धमक फकत मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . यासोबतची शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत विविध समस्यांचे निराकरण करणे बाबत निवेदन देण्यात आलेले आहेत .
सर्व विनाअनुदानित व अंशत : अनुदानित शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे पत्र काढुन पुढील टप्पा लागु करण्यात यावे असा महत्वाचा निर्णय लवकर घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे . तसेच संच मान्यता दुरुस्ती करुन 15 मार्च च्या पत्राबाबत विचार करावा असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच शळांना विजदर हे कमर्शियल करु नयेत असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच आश्रम शाळांची वेळा पुरवत करावी , अपंग समावेशित शिक्षकांना सेवेत कायम करावेत , तसेच अघोषित शाळांना घोषित करुन अनुदान द्यावेत . तसेच नाशिक जिल्हा वेतन पथकास पुर्ण निधी देवून प्रलंबित बिले मार्गी निघावेत , तसेच शिक्षक भरतीचे अधिकार संस्थांना देण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
ऑफलाईन संचमान्यता गृहीत धरण्याची मागणी करण्यात आली आहे , तसेच वारंवार एकच विषयावर निनावी नावाने माहिती अधिकार अर्ज करुन व्यक्तीबद्दल निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे .या संदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा – नाशिक यांच्यामार्फत मा.एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आलेले निवेदन पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.