आज तीन महिने संपले ! मागणी मान्य न झाल्यास राज्य कर्मचारी जाणार पुन्हा एकदा महासंपावर , पहा पेन्शनबाबत मंत्रालयीन कामकाज !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषद ) , नगरपरिषद / पालिका तसेच इतर पात्र बृहन्मुंबई पालिका प्रशासनातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना प्रमाणे पेन्शन योजना लागू करणेबाबत गठीत अभ्यास समितीस आज दि.14 जून 2023 रोजी तीन महिने पूर्ण झाले आहेत .

राज्य कर्मचाऱ्यांनी दि.14 मार्च 2023 पासून ते दि.20.03.2023 पर्यंत जुनी पेन्शन ( OPS ) मिळावी , या प्रमुख मागणीसाठी महासंप केला होता .हा संप मागे घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राज्य कर्मचाऱ्यांना NPS व OPS पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी त्रिस्तरीय अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती.

या अभ्यास समितीस अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आज दि.14 जून 2023 रोजी पूर्ण झाले आहेत .राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासन नुसार , तीन महिन्यांच्या आत जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येईल . आज दि .14 जून 2023 रोजी तीन महिने कालावधी पूर्ण झाले आहेत .

हे पण वाचा : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आले आठव्या वेतन आयोगा विषयी महत्त्वाचे अपडेट ; पहा कोण- कोणते बदल होतील !

राज्य शासन स्तरावर देखील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागू करणेबाबत , मंत्रालयीन स्तरावर कामकाज सुरू आहेत , परंतु राज्य कर्मचाऱ्यांना या जून महिना अखेर जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लागू न केल्यास , राज्य कर्मचारी पुन्हा एकदा महासंपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment