Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : जुनी पेन्शन योजना लागु करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश देण्यात आलेले आहेत , यामुळे NPS धारक कर्मचाऱ्यांचे स्वप्न भंगले आहेत . जुनी पेन्शन योजनासाठी न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली , आणि देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेनेचे जुनी पेन्शन योजना लागु करण्यास स्थगितीचे आदेश दिले आहेत .

केंद्र सरकारच्या अधिनस्त फक्त सैनिकांनाच जुनी पेन्शन योजना लागु आहे , या व्यतिरिक्त 2004 नंतर रुजु होणाऱ्या सर्वच केद्रीय कर्मचाऱ्यांना NPS योजना लागु करण्यात आलेली आहे . यामंध्ये केंद्रीय निमलष्करी दलातील ( CASF ) जवान हे निमलष्करी असल्याने त्यांना पुर्ण सैनिक जवानांचा दर्जा देण्यात आलेला नाही . त्यामुळे त्यांना सैनिकांप्रमाणे सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही .

यामुळे सदर निमलष्करी कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयांमध्ये जुनी पेन्शन मिळविण्यासाठी याचिका दाखल केली आहे .सदर दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असत्याने आता या जवानांना जुनी पेन्शनसाठी फेब्रुवारी 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे . या संदर्भात स्थगिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती संजीव खन्ना व न्या. बेला त्रिवेदी यांनी दिला आहे .

हे पण वाचा : लग्न न झालेल्या पुरुष आणि महिलांना मासिक 2750/- रुपयांची मासिक पेन्शन योजना सुरु ! राज्य सरकारची मोठा निर्णय !

CASF मध्ये आसाम रायफल्स , BSF , CISF , CRPF , ITBP , SSB , NSG दलांचा समावेश होतो .या दलांमधील जवानांना 2004 नंतर जुनी पेन्शन योजनेच्या कक्षेतुन वगळण्यात आले , व देशाचे लष्कर , नौदल आणि हवाई दलांमधील अधिकारी /कर्मचाऱ्यांनांच जुनी पेन्शन सुरु ठेवण्यात आली आहे .

परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने सदर CASF निमलष्करी दलातील जवानांना दिलासा दिला आहे कि , केंद्रीय निमलष्करी दल हे देखिल भारत देशाचे संघराज्याचे सशस्त्र दल असल्याने , सदर जवानांना NPS योजना बंद करुन जुनी पेन्शन योजनेच्या कक्षेत येतील . परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने सदर आदेशास स्थगिती दिली असल्याने , सदर जवानांना फेब्रुवारी 2024 ची पर्यंत वाट पहावी लागणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *