Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme update ] : देशांमध्ये जुनी पेन्शन योजनांच्या मागणीसाठी देशांमध्ये मोठे आंदोलन झाले होते , महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांनी देखिल जुनी पेन्शनच्या मागणीसाठी 7 दिवसांचे काम बंद आंदोलन केले होते , मात्र राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसारखी सुधारीत राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे .

अशी असणार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के मुळ वेतनाची रक्कम निवृत्तीवेतन म्हणून निश्चित करण्यात येईल ,व त्यावर महागाई भत्ताचा लाभ देखिल लागु करण्यात येणार आहे . परंतु NPS मधील कर्मचाऱ्यांचे 10 टक्के योगदान पुर्वीप्रमाणे कपात सुरु असणार आहेत .त्याचबरोबर अर्जित रजा रोखीकरण लाभ देखिल मिळणार आहेत .

तसेच कुटुंब निवृत्तीवेतनाची रक्कम निवृत्तीवेतनाच्या 60 टक्के एवढी निश्चित करण्यात येईल , अशी तरतुदी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये करण्यात येणार आहे . याबाबत राज्य शासनांकडून विधानसभा निवडणूकांपुर्वीच अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे .

या राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली जुनी पेन्शन परत रद्द : राजस्थान राज्यात काँग्रेसची सत्ता म्हणजेच गेहलोत यांची सत्ता असताना , तेथील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली होती , तर सध्या राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता स्थापन झाली असून भाजपाचे नवीन मुख्यमंत्री भजनलाल सरकारकडून जुनी पेन्शन योजना रद्द करण्याचा विचार करत आहेत .

हा एक प्रकारचा राजकिय डाव असल्याचे बालले जात आहे , भजनलाल सरकारकडून गेहलोक सरकारने लागु केलेली जुनी पेन्शनमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मांडला असून , यांमध्ये लवकरच धोरणात्मक बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती , आचारसंहिता नंतर याबाबत धोरणात्मक बदल केला जावू शकतो .

या निर्णयामुळे राजस्थान राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना हिरावून घेण्याचा राजकिय डाव होईल , तर तेथील राज्य कर्मचाऱ्यांना आंध्र प्रदेश राज्य सरकार प्रमाणे पेन्शन योजना लागु केले जाईल , अशी माहिती समोर येत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *