देशात कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणारे हे राज्य ठरले सहावे ! कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंदोत्सव !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme , SiKkim State ] : देशात यापुर्वी पंजाब , छत्तीसगढ , हिमाचल प्रदेश , राजस्थान , कर्नाटक या राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यात आलेली आहे . आता देशांमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन परत जुनी पेन्शन योजना लागु करणारे सिक्किम हे राज्य सहावे राज्य ठरले आहेत .

सिक्किम हे राज्य पुर्वोतर भागांमध्ये सात राज्यांपैकी एक राज्य आहे . सिक्किम राज्यांमध्ये दिनांक 01 एप्रिल 2006 आणि त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजू होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करुन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली होती . सदर NPS प्रणालीस कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी विरोध करण्यात येत होते , व पुन्हा जुनी पेन्शन योजनाची मागणी करण्यात येत होती .

यामुळे सिक्किम राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी सिक्किम राज्यातील दिनांक 01 एप्रिल 2006 रोजी व त्यानंतर रुजु झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनांचा लाभ लागु करण्यात आलेला आहे . तर सिक्किम राज्यातील कर्मचाऱ्यांना सिक्किम सेवा पेंशन नियम 1990 नुसार , जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीनंतर मिळणारे इतर सर्व आर्थिक लाभ लागु करण्यात आलेले आहेत . या निर्णयाचे सिक्किम राज्यातील कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहेत .

कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत : राज्यातील कंत्राटी तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याचा देखिल मोठा निर्णय सिक्किम राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे . तसेच कंत्राटी पदावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन धोरणांनुसार वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सिक्किम राज्यांने लागु केले आता , महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार ? : सिक्किम सारख्या छोट्या राज्यांनी जुनी पेन्शन लागु केली आहे , तर महाराष्ट्र राज्यासारख्या प्रगतीशिल राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ का लागु होऊ शकत नाही ? असा सवाल आता राज्यातील कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारला विचारला जात आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment