Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme samiti Mudatvadh GR ] : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस मुदतवाढ देणबाबत वित्त विभागांकडून दिनांक 01 फेब्रुवारी 2024 रोजी घाई- गडबडीत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 14 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार , NPS प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता उपाययोजना बाबत शिफारस / अहवाल राज्य शासनास सदर करण्यासाठी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे .
सदर समितीने 03 महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या , तसेच समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीचे सांख्यिकीय , आर्थिक , वैज्ञानिक , तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करुन राज्य शासनांस परिपुर्ण शिफारस / अहवाल सादर करण्यासाठी समितीस शासन निर्णय दिनांक 27 जुलै 2023 नुसार 02 महिन्यांसाठी दिनांक 14 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती .
चुकीचा घाई – गडबडीत शासन निर्णय निर्गमित : सदर शासन निर्णयानुसार सद्य : स्थितीमध्ये समितीचे अहवाल तयार करण्याचे कामकाज अंतरिम टप्यावर असून अंतिम परिपुर्ण अहवाल सादर करण्याकरीता समितीस दिनांक 15.11.2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे . म्हणजेच सदरचा शासन निर्णय हा दिनांक 01 फेब्रूवारी 2024 रोजी निर्गमित होत आहे , आणि सदर समितीस दिनांक 15.11.2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहेत . अशी चुकीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..