लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार: राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS ) व जुनी निवृत्तीवेतन योजना (OLD PENSION ) यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समिती पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 27 जुलै 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ..
राज्य शासनाच्या वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2023 नुसार , राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS ) व जुनी निवृत्तीवेतन योजना (OLD PENSION ) यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंति खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनाबाबत शिफारस अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवा अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली आहे ..
समितीस तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या , तथापि समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीची सांख्यिकीय, आर्थिक , वैज्ञानिक ,तांत्रिक दृष्ट्या विश्लेषण करून शासनास पूर्णपणे शिफारस अहवाल सादर करण्यासाठी समिती दिनांक 14 जून 2023 पासून पुढील दोन महिन्याचे मुदतवाढ देण्यात येत आहे ..
यापूर्वीच राज्य शासनाकडून दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत सदर समितीस मुदत वाढ देण्यात आली होती , परंतु सदर समितीस दुसऱ्यांदा पुन्हा मुदत वाढ देण्यात आली असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी वाढत आहे . यामुळे आता राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याची तयारी करत आहेत ..
वित्त विभागाकडून दिनांक 27 जुलै 2023 रोजी निर्गमित , शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी ,सेवानिवृत्त पेन्शनधारक /कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !