Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old Pension Scheme Reason For BJP Reduce Seats ] : भारतीय जनता पार्टीला यंदाच्या लोकसभामध्ये अत्यंत चुरशीचा सामना करावा लागला , तरीदेखील भाजपाला बहुमताचा आकडा पार करता आला नाही . मित्रपक्षाने भाजपाने 292 चा आकडा गाठला आहे .यामुळे सत्ता स्थापन होईल मात्र भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने , धाकधुक कायम असणार आहे .

जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर भाजपाच्या जागा घटल्या : भारतीय जनता पक्षाला यंदा उत्तर प्रदेश , महाराष्ट्र राज्यांमध्ये जुनी पेन्शनच्या मुद्यावर जागा कमी मिळाल्या आहेत असे मिडीया रिपोर्टनुसार स्पष्ट होत आहे . मोदींना मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी महत्व देताना दिसून आले आहे .  

तर महाराष्ट्र राज्यांमध्ये कांदा भाव , जुनी पेन्शन योजना , सोयाबिन बाजारभाव अशा मुद्द्यांवर राज्यातील जनतेने भाजपाला कमी महत्व दिले . महाराष्ट्र राज्यांमध्ये देखिल जुनी पेन्शनचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता . यामुळे निवडणुकांमध्ये कर्मऱ्यांचा कल निश्चितच इंडिया आघाडीच्या पक्षांच्या बाजुने झुकले आहे .

सत्ता स्थापनेसाठी एकूण 272 जागा आवश्यक आहेत , तर भारतीय जनता पार्टीला 240 जागा मिळाले आहेत . तर मित्र पक्षांमध्ये जनता दलाला 12 जागा तर चंद्रबाबू नायडू यांचे 16 खासदार आहेत . यामुळे नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे किंगमेकर ठरणार आहेत . जर या दोघांनी भाजपाची साथ सोडल्यास निश्चितच इंडिया आघाडीची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे .

जुनी पेन्शन चा मुद्दा चर्चेत येणार : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मुद्दा आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकच चर्चित येण्याची शक्यता आहे . देशामध्ये महाराष्ट्र राज्यासह काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका येत्या नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात होणार आहेत . यामुळे भारतीय जनता पार्टीला पेन्शन योजना मारक ठरू शकते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *