Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme Prasiddhipatrak ] : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने मार्फत दिनांक 05 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रक राज्यातील सर्व कर्मचारी बंधु – भगिनींच्या प्रति प्रसिद्ध करण्यात आलेला आहे .
सदर प्रसिद्धीपत्रकानुसार , राज्यातील दिनांक 01 नोव्हेबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना म.ना.से.अधि.1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु होणे ही बाब राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या भविष्य सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाची असल्याने , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना त्यासाठी सातत्साने प्रयत्न व मागणी करीत आहे .त्यासाठी विविध आंदोलने सघटनेमार्फत करण्यात आलेली आहे .
मात्र जो पर्यंत जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागु करणारे शासन येणार नाही तोपर्यंत सदर मागणी प्रर्णत्वास येणार नाही अशी धारण आहे , त्यामुळे संघटनेने वोट फॉर OPS ची मोहिम हाती घेण्यात आली आहे .देशाचे नेतृत्व आणि दिशा निर्धारित करणारी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर दि.10.04.2024 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले साहेब यांनी तसेच तदनांक 02.05.2024 रोजी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री श्री.सुभाष देसाई यांनी …
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेला जाहीर पत्र लिहून जुनी पेन्शन या मागणीला प्राधान्य देवून मागणीच्या पुरर्तेबाबत आश्वासित केले आहे . त्यामुळे संघटना तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा तथा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष यांचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जाहीर अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आलेले आहेत .
तर सदर प्रसिद्धीपत्रकानुसार सर्व कर्मचारी बंधुनी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सदर पक्षच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून VOTE FOR OPS ची मोहिम यशस्वी करण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.