Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme paripatrak dated 29 july 2024 ] : सन 2006 नियुक्त शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन ( Old Pension scheme ) योजना लागु करणेबाबत , नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत दिनांक 29 जुलै 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व पचायत समिती यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहेत .
सदर परिपत्रकानुसार राज्य शासनांच्या वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 02.02.2024 नुसार , तसेच मा.आ.सत्यजित तांबे विधान परिषद सदस्य यांचे दिनांक 24 जुलै 2024 रोजीच्या भाषणांनुसार नाशिक जिल्हा परिषद , नाशिक यांच्याडुन पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे .
सदर निर्णयांमध्ये नमदु करण्यात आले आहेत कि , शिक्षण सेवक पदांच्या पदभरती सन जानेवारी 2006 मध्ये दिलेल्या जाहीरातीनुसार नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांची जाहीरात व नियुक्ती आदेशानुसार जुनी पेन्शन योजना लागु होण्यास पात्र ठरत असलेले शिक्षण सेवक यांच्या विकल्प दिनांक 02.08.2024 रोजी मुदत संपत असल्याने संबंधित शिक्षण सेवकांचे विकल्प तात्काळ भरुन त्यांचे एक प्रत समक्ष जिल्हा परिषद नाशिक कार्यालयांमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या निर्णयामुळे नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ज्यांची नियुक्ती ही सदर निर्णयांमध्ये नमुद तारखेनंतर झालेली आहे , अशा शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे , या संदर्भात नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून निर्गमित सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहू शकता …
