Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Nirnay Cancel And NPS ] : मागील वर्षांमध्ये राजस्थान राज्य सरकारचे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थान मधील राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांना NPS योजना रद्द करुन परत जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आली होती .
आता या वर्षी राजस्थान विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षांने विजय मिळविल्याने , भारतीय जनता पार्टीचे भजनलाल यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यात आली आहे . यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी अशोक गहलोत यांनी पेन्शन बाबत घेण्यात आलेला सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय चक्क रद्द केला आहे . या ऐवजी परत राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे .
राजस्थान राज्य सरकारने काढलेल्या आदेशांमध्ये जुनी पेन्शन योजनांचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही , तर राष्ट्रीय पेन्शन योजना परत एकदा चालु करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे . सरकारने प्रसिद्ध केलेल्या सुचीमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनांचा उल्लेख असल्याने , जुनी पेन्शन योजना परत रद्द होणार हे नक्कीच .
या आदेशांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , कि राज्य शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या नवियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ऐवजी राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात येईल . याचाच अर्थ आता जुनी पेन्शन योजना परत रद्द होणार असून , पुन्हा सर्वांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात येईल .
या निर्णयाच्या विरोधात राज्यातील कर्मचारी सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे . या निर्णयावरुन स्पष्ट लक्षात येते , कि काँग्रसची सत्ता जाताच कर्मचाऱ्यांना दिलेला लाभ परत हिरावून घेण्यात आला आहे . यामुळे कर्मचारी वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त करण्यात येत आहेत .