Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme news ] : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने देखिल कर्मचाऱ्यांच्या मागणीवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहेत . भारतीय जनता पक्षांने कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन मागणीवर सकारात्मक निर्णय न घेतल्याने , लोकसभा निवडणुकीमध्ये विपरित परिणामाचा सामना करावा लागला .

उत्तर प्रदेश राज्यांमध्ये भाजपाला लोकसभेत निवडणुका 2024 मध्ये अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत , याचे कारण कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या मागणीवर तोडगा न काढणे हा देखिल आहे . यामुळे उत्तर प्रदेश राज्यांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील तब्बल 60,000 शिक्षकांना जुनी पेन्शन लागु करण्याचा निर्णय घेतला आहे .

विधानसभा निवडणुकीच्या 10 जागेवरील फेर निवडणुकीमध्ये होणार फायदा : लोकसभा निवडणुकींमध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या सदस्यांनी विजय मिळवून लोकसभेचे सदस्य स्वीकारलेल्या 10 विधासभा जागेवर निवडणुका होणार आहेत , त्या अनुषंगाने उत्तर प्रदेश राज्य सरकारने सदरचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे .

उत्तर प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासुन जुनी पेन्शनची मागणी होती , ती आता पुर्ण झाली आहे . उत्तर प्रदेश राज्याने दिनांक 28 मार्च 2005 रोजी अधिसुचना काढुन दिनांक 01 एप्रिल 2005 व त्यानंतर रुजु होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नविन पेन्शन योजना ( राष्ट्रीय पेन्शन योजना ) लागु करण्यात आली . यांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती / भरतीची जाहीरात / अधिसुचना सदर ( NPS योजना लागु होण्याच्या अगोदर )

दिनांकापुर्वीची आधी अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे . याकरीता उत्तर प्रदेशातील कर्मचाऱ्यांना अनेक आंदोलने तसेच कोर्टामध्ये लढाई लढावी लागली . शिवाय विरोधी पक्षाच्या नेत्यानी सदरचा मुद्दा अधिक जोर धरला होता , यामुळेच याबाबत उत्तर प्रदेश राज्य सरकारने याबाबत महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *