Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme new shasan nirnay dated 28 jun 2024 ] : दिनांक 28 जुन 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार ,नमुद अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा , कामगार व खनिकर्म विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आलेली आहे व ज्याची जाहीरात / भरतीची अथवा नियुक्तीची अधिसुचना नविन निवृत्तीवेतन योजना लागु करण्याच्या अधिसुचनेच्या दिनांकापुर्वी म्हणजेच दिनांक 22 डिसेंबर 2023 पुर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक 01 जानेवारी 2004 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत ..
व ज्यांना नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागु झाली , त्या केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 / 2021 लागु करण्याचा एक वेळ पर्याय देणेबाबत , केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनधारकांचे कल्याण विभागाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार निर्णय घेण्यात आला आहे . केंद्र शासनाच्या सदर निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासन सेवेतील जे अधिकारी / कर्मचारी दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर ..
शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत , तथापि त्यांची पदभरतीची जाहीरात / अधिसुचना दिनांक 01.11.2005 पुर्वी निर्गमित झालेली आहे . अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 , महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक निपयमांच्या तरतुदी लागु करण्यासाठी एक वेळ पर्याय वित्त विभागाच्या दिनांक 02.02.2024 रोजीच्या निर्णयानुसार देण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयानुसार राज्यातील उद्योग , उर्जा , कामगार व खनिकर्म विभाग अंतर्गत निर्णयातील विवरणपत्रात नमुद करण्यात आलेल्या सहाय्यक संचालक यांना वित्त विभागाच्या दिनांक 02.02.2024 रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 , महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागु करण्यात येत आहेत . याबातचा सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..